Pune News : महावितरणचा लाचखोर अभियंता जाळ्यात

पुण्यातली दिवसभरातील दुसरी कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात लाचलुचपत विभागाने दोन सरकारी कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. धानोरी परिसरातील महावीतरण ऑफिसमधील अभियंत्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू आहे. दीपक गोंधळेकर असे पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोकसेवक दीपक हा धानोरी ब्रँच येथे असिस्टंट इंजिनिअर आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांचे एमएसईबीत काम होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हे काम असिस्टंट इंजिनिअर असलेले दीपक यांच्याकडे होता. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.

त्यानुसार एसीबीने खात्री करत पडताळणी केली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. या नुसार आज एसीबीच्या सापळा कारवाईत 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील सहकार खात्यांमधील एका विशेष लेखापरीक्षक आला तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ललित कुमार भालचंद्र भावसार (वय 55) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील सहकारी संस्थेत काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.