Mughal Garden News : आता नवीन नावाने ओळखलं जाणार राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’

एमपीसी न्यूज- देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’ चे नाव बदलण्यात आले (Mughal Garden News) आहे. आता हे मुघल गार्डन ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखले जाईल.

प्रधानांच्या  विचारांतून प्रेरणा घेऊन हे नाव बदलण्यात आले आहे. ‘देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली असून त्यानिमित अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. हे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील उद्यानांचे ‘अमृत उद्यान’ असे नामकरण केले आहे’, अशी माहिती राष्ट्रपती भवनाच्या माध्यम विभागातील उपसचिव नाविका गुप्ता यांनी शनिवारी दिली.

तसेच उद्यानात येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी आता सर्व सर्व वनस्पती व झाडांजवळ क्यू आर कोड लावण्यात येईल. तसेच 20  मार्गदर्शक येथे काम करतील,असेही त्यांनी नमूद केले.

Pune crime news : चंदनाच्या झाडांची चोरी

राष्ट्रपती भवन व 15 एकरमध्ये पसरलेलं विस्तीर्ण असे या परिसरातील हे मुघल उद्यान ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी  डिझाईन केलं होतं. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. त्यानंतर दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुले (Mughal Garden News) केले जाते. यंदाही हे ’ 31 जानेवारी ते 26 मार्च पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. या उद्यानात 138 प्रकारचे गुलाब, 10 हजार पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5 हजार हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. या उद्यानाचा एक मोठा भाग हा वैविध्यपूर्ण गुलाबांसाठी ओळखला जातो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.