Mukesh Ambani: मुकेश अंबानी आता जगातील सहावे सर्वांत श्रीमंत व्यक्ती, गुगलचे लॅरी पेज यांना टाकले मागे

mukesh ambani becomes worlds 6th richest person सोमवारी अमेरिकन शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम लॅरी पेज यांच्या संपत्तीवर झाला.

एमपीसी न्यूज- रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी आता जगातील सहावे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांनी आता गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 72.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यापूर्वी जूनमध्ये अंबानींनी जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान पटकावले होते.

सोमवारी त्यांनी हॅथवे बर्कशायरचे वॉरेन बफे यांचे स्थान घेतले होते. बफे हे सातव्या स्थानावर होते. जगातील सर्वाधिक पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी आशिया खंडातील एकमेव व्यक्ती आहेत.

पहिल्या स्थानावर ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 184 अब्ज डॉलर आहे. त्यानंतर सहा सर्वांत श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स (115 अब्ज डॉलर), बर्नार्ड अर्नाल्ट (94.5 अब्ज डॉलर), मार्क झकरबर्ग (90.8 अब्ज डॉलर), स्टेले बालमर (74.6 अब्ज डॉलर) आणि मुकेश अंबानी (72.4 अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.

सोमवारी अमेरिकन शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम लॅरी पेज यांच्या संपत्तीवर झाला. तर ब्रिन यांची संपत्ती 69.4 बिलियन डॉलर आणि टेस्ला इंकचे मस्क यांची 68.6 अब्ज इतकी आहे. तर वॉरेन बफे यांनी मागील आठवड्यात त्यांच्या संपत्तीतील 2.9 अब्ज डॉलरची संपत्ती दान केल्यानंतर त्यांच्या एकूण संपत्तीत थोडी घसरण झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.