Lonavala : लोणावळा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मुकेश परमार

कार्याध्यक्ष पदी माजी नगरसेवक बाळासाहेब कडू

एमपीसी न्यूज – लोणावळा शहराचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावरील विकास साधण्यासोबत पर्यटनाच्या दृष्टीने नावलौकीक वाढविण्यासाठी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या लोणावळा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी भाजपचे युवकाध्यक्ष मुकेश परमार यांची तर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक बाळासाहेब कडू यांची निवड जाहीर करण्यात आली.

लोणावळा विकास प्रतिष्ठान नुतन कार्यकारणी :

मुकेश परमार (अध्यक्ष), बाळासाहेब कडू (कार्याध्यक्ष), भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी व नगरसेवक दिलीप दामोदरे (उपाध्यक्ष), गणेश मावकर (सचिव), अशोक मानकर (सहसचिव), उमेश तारे (खजिनदार), मंगेश आगरवाल (सहखजिनदार), भगवान तनवाणी, डॉ.अभय कामत व अॅड.अविनाश पवार (सल्लागार), संजय गायकवाड, मंजू वाघ, शादान चौधरी, सेजल परमार, गौरी मावकर, अंजना कडू, आशा खिल्लारे, रंजना दुर्गे, हेमंत मुळे, सुधीर राईलकर, डाॅ.अमोल कालेकर (सदस्य).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.