Mulshi :घरावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण

हिंजवडी पोलिसांनी आरोपींना केले अटक

एमपीसी न्यूज-  घरावर दगड मारल्याचा विचारला म्हणून वडील व मुलाने दोघांना लोखंडे रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री दत्तवाडी,मुळशी परिसरात घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तय्युब बाबू शेख (वय 35, रा.दत्तवाडी, मुळशी) व बाबू मेहबूब शेख (वय 60 रा. दत्तवाडी, मुळशी) या दोघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात गणेश भीमराव वायकर (वय 21 रा. दत्तवाडी, मुळशी) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी (गणेश भीमराव वायकर) यांचा वाढदिवस(Mulashi) होता. त्यामुळे त्यांच्या घरी त्यांचे दाजी,मामा, मित्र असे सर्वजण (Mulashi)जेवणासाठी आले होते. यावेळी त्यांच्या घराच्या पत्र्यावर तय्युब याने दगड मारला व तो पळून गेला.याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे घरी आलेले नातेवाईक आरोपीच्या घरी गेले असता आरोपीने शिवीगाळ करत लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारले. तसेच त्यांच्या बचावासाठी घरी आलेल्या नातेवाईकांना देखील बाबू शेख याने प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करत जखमी केले. हिंजवडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.