Mulshi Crime : मोक्कांतर्गत गुन्ह्यांमधील गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेले आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण (Mulshi Crime) दहशतवाद विरोधी शाखेने मोक्कांतर्गत गुन्ह्यांमधील गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे. जॅकी उर्फ स्वप्नील पडळघरे (वय 35 वर्षे, रा. पडळकरवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे), नवनाथ भोईने (वय 28 वर्षे, रा मोरेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडण्यासाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 29 सप्टेंबरला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व त्यांच्या पौड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 307, 147, 148, 149, 34 सह मोक्काच्या गुन्ह्यातील गेल्या दोन वर्षापासून परळी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले होते.

तसेच, या गुन्ह्यातील फरारी (Mulshi Crime) असलेले अजून दोन आरोपी हे परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून दहशतवाद विरोधी शाखा पथकाने सापळा रचून आरोपी जॅकी उर्फ स्वप्निल पडळघरे व नवनाथ भोईने रिहे परिसरातून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईकामी पौड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, भाऊसाहेब ढोले पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, ईश्वर जाधव, पोलीस हवालदार विशाल भोरडे मोसीन शेख या पथकाने केली. तसेच तांत्रिक मदत सायबर पोलीस ठाण्याचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली.

Crime News : फेसबुक ओळख झालेल्या वकिलाचा तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.