Mulshi dam: मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढवून 13,200 क्यूसेक

एमपीसी न्यूज: मुळशी धरणाच्या सांडव्यातून सायं. 7 वाजता विसर्ग वाढवून 13 हजार 200 क्युसेक करण्यात आलेला आहे. धरण परिसरात पर्जन्यमान वाढत असून आवश्यकतेनुसार विसर्गतेत वाढ होऊ शकते असे बसवराज मुन्नोळी, टाटा पॉवर यांनी सांगितले आहे.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. (Mulshi dam)नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असेही ते म्हणाले. यापूर्वी मुळशी धरणाच्या सांडव्यातून सायं. 5 वाजता विसर्ग 5 हजार क्युसेकवरून वाढवून 10 हजार 560 क्युसेक करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.