Mulshi : पुरास्थिती निवळणार; मुळशी धरणातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज – मागील तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, वाकड भागात पूर आला. अनेकांची घरे, दुकाने, कार्यालये या पुरात बुडाली. ही पूरस्थिती निवळणार आहे. मुळशी धरणातून होणार विसर्ग कमी झाला आहे. मंगळवारी (दि. 6) दुपारी तीन वाजता मुळशी धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

मुळशी धरणातून होणा-या विसर्गामुळे मुळा नदीला पूर आला. मुळा नदीचे पाणी सांगवी, वाकड, कस्पटेवस्ती, मानकर चौक, बोपोडी भागात शिरले. मागील तीन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे अनेक घरे, दुकाने, कार्यालये पुरात बुडाली. हजारो नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून होणारा विसर्गही कमी होत नव्हता. यामुळे मुळा नदीला पुर आला.

  • सोमवारी (दि. 5) मुळशी धरणातून मुळा नदीत 39 हजार 611 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मंगळवारी पहाटे पावसाने जराशी उघडीक दिल्याने धरणात येणारे पाणी कमी झाले आहे. मुळशी धरणातून सकाळी अकरा वाजता 10 हजार क्युसेक विसर्ग केला. त्यानंतर दुपारी तीन वाजता हा विसर्ग पाच हजार क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.