Mulshi : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पिरंगूटमध्ये हजारहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा प्रतिसाद

एमपीसी न्यूज : मुळशी तालुक्यातील पिरंगूट येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या (Mulshi) स्मृतीप्रित्यर्थ श्री शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी तब्बल 1005 जणांनी रक्तदान केले असून 44 वर्षीय संतोष पवळे यांनी 40 वे रक्तदान केले, तर पीएसआय संतोष भूमकर यांनी 50 वे रक्तदान केले. यावेळी तरुणांसोबतच महिलांचाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

सुरभी बँक्वेट हॉल येथे हे शिबिर संपन्न झाले. दरवर्षी फाल्गुन महिन्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी यांच्या वतीने  बलिदान मास पाळला जातो. यावेळी धारकरी हे छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण महिना सूतक पाळतात. तर, याच महिन्यात रक्तदान करून समाजाचे कर्तव्य पाळून या शिबिराचे आयोजन करतात. यंदाच्या रक्तदान शिबिरात हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.

Punawale : पुनावळेतून 44 लाखांचा गुटखा जप्त

यावेळी सर्व रक्तदात्यांना मुकपद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जमा झालेले रक्त हे पुणे ब्लड बँक या  रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले. दरवर्षी या शिबिराला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.