Mulshi : संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीच्या अध्यक्षपदी जनार्दन पायगुडे

एमपीसी न्यूज – संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नेरे, मारुंजीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या अध्यक्ष पदावर जनार्दन पायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. नरुटे यांनी याबाबतची घोषणा केली.

यावेळी बबन पायगुडे, संपत जाधव, लक्ष्मण शिंदे, दिलीप जाधव, बाळासाहेब पायगुडे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

  • नवीन कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष पदावर हिरामण जाधव यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून दत्तात्रय गाढवे, छाया शिंदे, जालिंदर जाधव, प्रकाश बुचडे, राजुशेठ कदम आदींची निवड झाली.

अध्यक्ष पदासाठी जनार्दन पायगुडे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नरुटे यांनी पायगुडे यांच्या नावाची घोषणा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.