Mulshi News :’कोरोना संकटकाळात शेतीपंपाचे वीजबिल माफ करा’

सध्याच्या काळात शेतीपंपाचे वीजबिल भरणे शेतक-यांना शक्य होणार नाही. : Forgive the electricity bill of the agricultural pump during the Corona crisis

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतीपंपाचे वीजबिल भरणे शेतक-यांना शक्य होणार नाही. त्यामुळे शेतक-यांच्या मागील तीन महिन्यांचे शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेतर्फे अध्यक्ष मेहेश कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे तालुकाध्यक्ष तेजस घारे, जयेश भदाणे, शुभम कांबळे, आशिष भोईटे आदी पदाधिकाऱ्यांनी मुळशीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

सध्याच्या काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे मुळशी तालुक्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. अशात शेती पंपाचे येणारी मोठ्या रक्कमेची वीजबिले शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहेत.

त्यामुळे मागील तीन महिन्यांचे शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे; अथवा वीजबिलात सवलत द्यावी, अशी विनंती संघटनेने निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.