Mulshi News : युवकांनी श्रमदानाचा ध्यास मनापासून अंगिकारावा –  रोहन जगताप

एमपीसी न्यूज – युवकांनी शालेय जीवनातच स्वच्छता व श्रमदानाचा ध्यास अंगाकारावा, असे मत सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप ( Mulshi News ) यांनी व्यक्त केले. ते  कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मुळशीतल सांगवडे गाव येथे आयोजीत विद्यार्थ्यांच्या श्रम संस्कार शिबिरात बोलत होते.

हे शिबिर 1 ते 7 जानेवारी या कालावधीत युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास अंतर्गत आयोजित केले आहे. यावेळी  उपसरपंच योगेश राक्षे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप सपकाळ या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभलेले लायन क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे विभाग अध्यक्ष ला. हर्ष नायर, ला. संदीप पोलकम, ला. प्रशांत कुलकर्णी, ला. एकनाथ चौधरी महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्लेषा देवळे, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. प्रिया गायकवाड, डॉ. आनंद लुंकड, पौर्णिमा अगरवाल, प्रा. पांडुरंग इंगळे, विद्यार्थी, प्रतिनिधी अनिकेत शिंदे, श्वेता वर्मा, प्रतिक्षा कलापुरे आदी उपस्थित होते.

 

Nigdi News : दाखल्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या डाटा ऑपरेटरला अटक

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया म्हणाले की , सांगवडे गावात सुशिक्षीत पदवीधर व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सरपंच जगताप सारखे व्यक्तिमत्व येथील गावाला मिळाला आहे, याचा विशेष आनंद होत आहे.

पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेत 700 महाविद्यालये असून त्यापैकी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी शिबीराच्या माध्यमातून 7 दिवस घरापासून ग्रामीण ( Mulshi News ) भागात राहून तेथे श्रमदान आदी उपक्रमे राबवित एकरूप होतात. आपल्या आतील उर्जेला दिशा येथे मिळते, अशातूनच त्याचे भावी आयुष्य सुखकारक बनेल. येथे सात दिवस शिस्तबद्ध पद्धतीने राहून वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून आपल्या महाविद्यालयाचा व स्वतः वेगळा ठसा उमटवा , असे आवाहन त्याने यावेळी केले.

ला. प्रशांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला सहभागी शिबीरार्थींना दिला. प्रगतशील शेतकरी सचिन राक्षे म्हणाले, विद्यार्थ्यांना येथील शेतात या तेथील शेतकर्‍यांकडून शेती विषयक माहिती घ्या, जे जे सहकार्य हवे आहे ते ग्रामस्थ करतील.

सात दिवस होणार्‍या शिबीरात विचार मंथन सत्रात संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, अंधश्रद्धा निर्मुलनचे मिलिंद देशमुख, संजय जगताप, प्रा. वैशाली वाघोले शिबीरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत, असे कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्लेषा देवळे यांनी( Mulshi News ) सांगून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले., तर आभार प्रा. सुकलाल कुंभार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.