Mulshi : घरफोडी करून सोन्याच्या बांगड्या पळवल्या

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्याने घरातून दोन (Mulshi) सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना 29 मे रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुस रोड येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : खासदार निधीतून विविध विकास कामे सुरू; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने 60 हजार रुपये किमतीच्या 27 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.