Student Drowned : सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : मुळशी तालुक्यातून सिंहगड किल्ल्यावर सहलीसाठी आलेल्या एका बारावीच्या विद्यार्थ्यांचा गडावरील हत्ती टाक्यात बुडून मृत्यू झाला. (Student Drowned) रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शाहिद मुल्ला असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोशी तालुक्यातील प्रियदर्शनी स्कूलमध्ये तो बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शाहिद मुल्ला हा आपल्या इतर मित्रांसोबत रविवारी सहलीसाठी सिंहगड किल्ल्यावर आला होता. त्यांच्यासोबत चार शिक्षक आणि इतर विद्यार्थी होते. रविवारी दुपारच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावरील हत्ती टाके परिसरात तो फिरत असताना पाय घसरल्याने तो थेट पाण्यामध्ये पडला. (Student Drowned) दरम्यान इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर गडावरील स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढले. नंतर त्याला प्रथमोपचार देऊन तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Farmer suicide : नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत जुन्नरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावर देखील पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत आहे. (Student Drowned) गडावरील हत्ती टाके हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. दरम्यान पाण्यात पडल्यानंतर शाहिद चा शोध घेण्यास उशीर झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.