Mumabi : राज्यात आज कोरोनाचे 1576 नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 29,100

6564 रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 29 हजार 100 झाली आहे. आज 1576  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 505  कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 6564  रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 21 हजार 467  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 50 हजार 436  नमुन्यांपैकी 2  लाख 21  हजार 336  जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले. तर 29  हजार 100 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3  लाख 29 हजार 302 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 16 हजार 306  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 49 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 1068  झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 34, पुण्यात 6, अकोला शहरात 2, कल्याण डोंबिवलीमध्ये 2, धुळयात 2 ,पनवेलमध्ये 1 ,जळगाव 1  तर औरंगाबाद शहरात 1  मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 29  पुरुष तर 20  महिला आहेत.

आज झालेल्या 44 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 22  रुग्ण आहेत तर 23  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4  जण 40 वर्षांखालील आहे. या 49  रुग्णांपैकी 32  जणांमध्ये (65टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.