Mumabi : जाणून घ्या ऐश्वर्या का बरं भावुक झाली ?

एमपीसी न्यूज : लग्नानंतर विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबामध्ये एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. केवळ इतकंच नाही तर ती सासू-सासऱ्यांची लाडकी सूनदेखील झाली आहे. मात्र, एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सासू जया बच्चन यांचं भाषण ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने भारताला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्याआधी सुश्मिता सेनने देखील सौंदर्यस्पर्धांमध्ये पहिल्यांदा बाजी मारली होती. पुढे ऐश्वर्याने अनेक उत्तमोत्तम हिंदी चित्रपट केले. तिने २००७ साली अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि लाइमलाईटपासून ती थोडी दूर गेली.

बच्चन फॅमिली म्हणजे एकाच घरात अभिनय क्षेत्रातील सगळे आयकॉन. मात्र, नंतर भारतीय पद्धतीनुसार तिने स्वत:चे नाव ऐश्वर्या राय-बच्चन असे लावायला सुरुवात केली. नंतरच्या काळात कान्स फेस्टिव्हलला रेड कार्पेटवर वॉक करणारी ऐश्वर्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरली.

तिचे बच्चन कुटुंबासोबत एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. केवळ इतकंच नाही तर ती सासू-सासऱ्यांची लाडकी सूनदेखील झाली आहे. मात्र, एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सासू जया बच्चन यांचं भाषण ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.

लोकप्रिय अभिनेत्री असूनदेखील ऐश्वर्या तिच्या कुटुंबातील जबाबदाऱ्याही नीट पार पाडते. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर तिचे संगोपन करण्यासाठी ऐश्वर्याने थोड्या काळासाठी चित्रपट संन्यास घेतला होता. तिला सोशल मिडियावर कोणीही ट्रोल करत असेल तर सासरेबुवा बिग बी आणि पतीराज अभिषेक त्याचा खरपूस समाचार घेतात.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात जया बच्चन यांनी ऐश्वर्याबद्दल काढलेल्या उद्दगारांमुळे ऐश्वर्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर गाजत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यातील असून जया बच्चन यांनी मंचावर ऐश्वर्याचं प्रचंड कौतुक केलं.

‘ती केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर आदर्श सूनदेखील आहे’, असं त्या म्हणाल्या. यासोबतच तिच्याविषयी त्यांना आवडलेल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ज्या ऐकून ऐश्वर्याला रडू आलं.

‘आज मी अशा एका गोड मुलीची सासू होत आहे जिच्याकडे सगळे संस्कार आहेत. तिच्याकडे गोड हास्य आहे. आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. लव्ह यू’, असं जया बच्चन या पुरस्कार सोहळ्यात म्हणाल्या. विशेष म्हणजे त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर त्यांची लेक श्वेता बच्चन नंदा हिलादेखील रडू आलं.

दरम्यान,ऐश्वर्या राय हिचं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत खास नातं आहे. विशेष म्हणजे बिग बी, ऐश्वर्याला सून म्हणून नाही तर मुलगी मानतात हे अनेक वेळा पाहायला मिळालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.