Mumbai: महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. मुंबई एका 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 ने वाढून 74 वर पोहचली आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी सहा रुग्ण मुंबईत आढळले असून मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26 वर जाऊन पोहचली आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 320 झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती, मात्र गेल्या दोन दिवसांत मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मुंबई हे सर्वाधिक गर्दी असणारे शहर असल्यामुळे या संसर्गजन्य रोग पसरण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे मुंबईत आणखी कडक उपाययोजना करावी लागण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1