Mumbai : ‘टाटा’नंतर ‘जेएसडब्लु’ ग्रुपकडून पंतप्रधान मदतनिधीला 100 कोटींची मदत

एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाचे धैमान सुरू असताना कोरोना विरूद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मदतनिधीला आता सर्व स्तरातून मदत येत आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सकडून 1500 कोटींची मदत देण्यात आलेल्या नंतर ‘जेएसडब्लु’ ग्रुपकडून 100 कोटींची मदत आज (रविवारी) देण्यात आली.

जेएसडब्लु ग्रुपचे सज्जन जिंदाल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली. जिंदाल म्हणाले, पंतप्रधान मदतनिधीला मदत करण्यासाठी तत्काळ 1000 कोटी रुपयांचे योगदान देत आहे. कोविड -19 च्या फॉल आउटशी लढण्यासाठी सर्व आवश्यकतेचे आम्ही मूल्यांकन करीत राहू. भविष्यातील आवश्यकतेसाठी गतीशीलतेने प्रतिसाद देण्यासाठी पुढील निधी राखीव ठेवला असल्याचे जिंदाल म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हाकेला प्रतिसाद देत आत्तापर्यंत अक्षय कुमार, सुरेश रैना, सीआरपीएफ जवान, सचिन तेंडुलकर यांनी मदत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.