Mumbai : राज्यात आज 1233 नवे रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 16 हजार 758 –आरोग्यमंत्री

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 758 झाली आहे. आज 1233 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 275 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3094 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात 2 लाख 11 हजार 112 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.आज राज्यात 34 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 651 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील 25, पुण्यातील 3, अकोला शहरात 3, जळगाव शहरात 1 तर सोलापूर शहरात 1 मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 21 पुरुष तर 13 महिला आहेत.

आज झालेल्या 34 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 18 रुग्ण आहेत तर 13 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. 34 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (79 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: 10,714 (412)

ठाणे: 86 (2)

ठाणे मनपा: 543 (8)

नवी मुंबई मनपा: 519 (4)

कल्याण डोंबिवली मनपा: 247 (3)

उल्हासनगर मनपा: 13

भिवंडी निजामपूर मनपा: 21 (2)

मीरा भाईंदर मनपा: 187 (2)

पालघर: 36 (1)

वसई विरार मनपा: 175 (4)

रायगड: 60 (1)

पनवेल मनपा: 115 (2)

ठाणे मंडळ एकूण: 12716 (441)

नाशिक: 24

नाशिक मनपा: 48

मालेगाव मनपा: 391 (12)

अहमदनगर: 44 (2)

अहमदनगर मनपा: 9

धुळे: 8 (2)

धुळे मनपा: 24 (1)

जळगाव: 51 (11)

जळगाव मनपा: 14 (2)

नंदूरबार: 19 (1)

नाशिक मंडळ एकूण: 632 (31)

पुणे: 103 (4)

पुणे मनपा: 1861 (115)

पिंपरी चिंचवड मनपा: 123 (3)

सोलापूर: 6

सोलापूर मनपा: 169 (8)

सातारा: 89 (2)

पुणे मंडळ एकूण: 2351 (132)

कोल्हापूर: 10 (1)

कोल्हापूर मनपा: 6

सांगली: 32

सांगली मिरज कुपवाड मनपा: 3 (1)

सिंधुदुर्ग: 4 (1)

रत्नागिरी: 16 (1)

कोल्हापूर मंडळ एकूण: 71 (4)

औरंगाबाद:3

औरंगाबाद मनपा: 370 (11)

जालना: 8

हिंगोली: 58

परभणी: 1 (1)

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 441 (12)

लातूर: 19 (1)

लातूर मनपा: 0

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: 3

नांदेड मनपा: 28 (2)

लातूर मंडळ एकूण: 54 (3)

अकोला: 8 (1)

अकोला मनपा: 75 (8)

अमरावती: 4 (1)

अमरावती मनपा: 69 (9)

यवतमाळ: 92

बुलढाणा: 24 (1)

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 276 (20)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 180 (2)

वर्धा: 0

भंडारा: 1

गोंदिया: 1

चंद्रपूर: 1

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण:188 (2)

इतर राज्ये: 32 (6)

एकूण: 16 हजार 785 (651)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.