Mumbai : दिवसभरात नवीन 150 रुग्ण, 12 मृत्यू, राज्यात कोरोनाबाधिताची संख्या 1018 वर, मृतांचा आकडा 64!

एमपीसी न्यूज – राज्यात आज 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 1,018 झाली आहे. आज राज्यात 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कोविडबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैंकी 6 मुंबईत, 2 पुण्यात तर प्रत्येकी 1 मृत्यू नागपूर सातारा आणि मीरा भाईदर येथे झाला आहे. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 64 झाली आहे.

1) आज सकाळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या एका 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.
2) आज सकाळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या एका 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.
3) आज सकाळी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजाअर असल्याने डाएलिसिसवर असणा-या असणा-या एका 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेशप्रवास केलेला नव्हता.
4) काल संध्याकाळी मधुमेह असणा-या एका 68 वर्षीय पुरुषाचा इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे मृत्यू झाला.
5) मुंबईतील एका 72 वर्षीय महिलेचा आज सकाळी के ई एम रुग्णालयात मृत्यू झाला.या महिलेला उच्च रक्तदाब आणि हायपोथायरॉडिझमचा त्रास होता.
7) फुप्फुसाचा क्षयरोग असणा-या एका 48 वर्षीय महिलेचा 4 एप्रिल रोजी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मृत्यू झाला.
7) हिरा कंपनीत काम करणा-या एका 55 वर्षीय कामगाराचा काल संध्याकाळी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
8) मधुमेह, उच्च रक्तदाब असणा-या एका 67 वर्षीय पुरुषाचा काल मुंबई पोर्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली होती.
9) बोरिवली येथील 66 वर्षीय पुरुषाचा काल संध्याकाळी मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
10) मीरा भाईदर येथील 60 वर्षीय पुरुषाचा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आज मृत्यू झाला.
11) आग्रीपाडयातील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या 68 वर्षीय पुरुषाचा मुंबईत मृत्यू झाला.
12) सातारा येथील जिल्हा रुग्णालयात एका 63 वर्षीय पुरुषाचा काल सकाळी मृत्यू झाला. हा रुग्ण अमेरिकेहून आला होता.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 20,877 नमुन्यांपैकी 19,290 जणांचे प्रयोगशाळा नमुनेकरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1,018 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 79 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 34,695 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4,008 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 23 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, बुलढाणा जिल्ह्यात 6 आणि प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनर्मेट कृति योजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या साता-यात 214 सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर हिंगोलीत 14, सांगलीत 31, रत्नागिरीमध्ये 39 आणि जळगावमध्ये 48 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 3,492 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 12 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.