Mumbai : ‘१७ वर्षे वय ते १७ इंच दंड.. असा झाला बदल’, असं कोणता हा कलाकार म्हणतोय बरं ?

mumbai : '17 year old to 17 inch muscle that's how it changed'- devdatta nage

एमपीसी न्यूज –  ‘१७ वर्षे वय ते १७ इंच दंड.. असा झाला बदल’ म्हणजे काय बरं ? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तर ‘जयमल्हार’ मधील ‘खंडोबा’ देवदत्त नागे याने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत देवदत्त सतरा वर्षाचा होता. पण त्याही वेळी त्याचे फिजिक उत्तम होते. कोवळ्या वयातला तो बॉडी बिल्डर फोटो बघितल्यावर देवदत्तचे फिटनेसचे प्रेम आपल्या लक्षात येते.

त्याच फोटोत त्याने त्याचा सध्याचा १७ इंच दंड असलेला फोटो पोस्ट केला आहे. फोटोला कॅप्शन आहे, ‘१७ वर्षे वय ते १७ इंच दंड.. असा झाला बदल’. मालिकेच्या सेटवर देखील व्यायाम करणारा देवदत्त आपल्याला माहित आहेत. त्याचे व्यायामाचे प्रेमदेखील सर्वश्रुत आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून देवदत्त आता इथवर पोचला आहे. पण त्याने व्यायामात कधीही खंड पडू दिला नाही.

लॉकडाऊनच्या या काळात आपले जुने फोटो बघणे हा प्रत्येकाचा विरंगुळा झाला आहे. त्यामुळे सध्या जुने फोटो विविध सोशल मिडीयावर शेअर होत आहेत. असाच एक फोटो देवदत्तने देखील नुकताच शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. खंडोबाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकलेला देवदत्त सध्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाला.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातही तान्हाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांची भूमिका देवदत्तने साकारली होती. त्याचा हा दुसरा बॉलिवूड चित्रपट असून याआधी त्याने ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.