Mumbai : राज्यात आज 2 हजार 436 नव्या रुग्णांची नोंद; दिवसभरात 60 कोरोना बळी

2 thousand 436 new patients registered in the state today; 60 corona victims in a day

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 667 झाली आहे. आज 2436 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 18 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 35 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आज एका दिवसात राज्यभरातून 1186 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक 900 रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 501, ठाणे 337, पालघर 16, रायगड 46, नाशिक 4, जळगाव 3, पुणे 109, सोलापूर 2, कोल्हापूर 3, सांगली 3, रत्नागिरी 9, औरंगाबाद 94, जालना 2, हिंगोली 1, लातूर 10, उस्मानाबाद 2, अकोला 17, अमरावती 4 आणि नागपूर 23 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52 हजार 667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 30 हजार 247 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 479 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 60 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1695 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 54 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित 6 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 38, पुण्यात 11, नवी मुंबईत 3, ठाणे  शहरात 2, औरंगाबाद शहरात 2, सोलापूरात 1, कल्याण डोंबिवलीमध्ये 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 42 पुरुष तर 18 महिला आहेत. आज झालेल्या 60 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 27 रुग्ण आहेत तर 29  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे.

या 60 रुग्णांपैकी 47 जणांमध्ये (78 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.