Mumbai : राज्यात 27 मृत्यू, 180 रुग्ण कोरोनमुक्त, 583 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण संख्या 10,498

एमपीसी न्यूज : राज्यात दिवसभरात 27 कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 583 रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10,498  वर पोहोचली आहे. तर 180 रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंत एकूण १७७३ रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी गेले आहेत.

आज मृत्यू झालेल्या 27 पैकी मुंबई येथील सर्वाधिक 20, पुणे महापालिका हद्दीतील 3,  ठाणे शहरातील 2 आणि नागपूर आणि रायगड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये 19  पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. या पैकी 14 रुग्ण 60  वर्षांपुढील होते. तर अन्य 13  जण 40  ते 59  वर्ष वयोगटातील आहेत. मृतांपैकी 22  जणांना 81  टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग असे गंभीर आजार आढळून आले. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 459  बळी गेले आहेत.

आज राज्यभरात एकूण 1,45,798  नमुन्यांपैकी 1,34,244 रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. तर 10,498  नमुने पॉझिटिव्ह आहे. सध्या राज्यात 1,68,266 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 10,695  नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.