Mumbai : राज्यात गेल्या 48 तासांत 278 पोलीस कोरोना ‘पॉझिटीव्ह’; कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 1,666 वर

Mumbai: 278 police corona 'positive' in last 48 hours in the state; The number of coronated policemen is 1,666, while 16 policemen have died

एमपीसी न्यूज – मागील 48 तासात महाराष्ट्र राज्यात 278 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे एकूण कोरोनाबधित पोलिसांचा आकडा 1 हजार 666 वर पोहोचला असून 16 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 473 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. 1 हजार 177 पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.

राज्यात आजवर 1 हजार 666 पोलीस कोरोनाबधित झाले आहेत. त्यात 183 अधिकारी आणि 1 हजार 483 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील 35 अधिकारी आणि 438 कर्मचारी अशा एकूण 473 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने 1 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या राज्यात 147 अधिकारी आणि 1 हजार 30 कर्मचारी असे एकूण 1 हजार 117 पोलीस विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

22 मार्च ते 22 मे या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात 1 लाख 12 हजार 8 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रशानाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई केली आहे. तर 680 जणांवर क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील दोन महिन्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या 247 घटना घडल्या आहेत. त्यात 823 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यांमध्ये 85 पोलीस आणि एक होमगार्ड असे 86जण जखमी झाले आहेत. राज्यात मागील दोन महिन्यात 41 आरोग्य सेवक, डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने दोन महिन्यात 100 नंबरवर 95 हजार 291 फोन आले आहेत.

बेकायदेशीर वाहतूक केल्याबाबत 1 हजार 317 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात एकूण 22 हजार 543 जणांना अटक झाली आहे. पोलिसांनी 69 हजार 46 वाहने जप्त केली आहेत. तर संबंधितांकडून 5 कोटी 19 लाख 63 हजार 497 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.