Mumbai: पुण्यात आणखी चार तर राज्यात नवीन 23 कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची एकूण संख्या 891!

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून राज्यात आज (मंगळवार) नवीन 23 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 891 वर जाऊन पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत 52 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

नव्याने सापडलेल्या 23 कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई 10
सांगली 1
पुणे 4
नगर 3
बुलढाणा2
ठाणे 1
नागपूर 2

राज्यात काल (सोमवारी) 120 रुग्ण नवीन रुग्ण आढळून आले तर कोरोनाबाधित 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यामुळे रुग्णांचा आकडा 868 झाला होता तर मृतांचा आकडा 52 झाला होता. त्यात आज नवीन 23 रुग्णांची भर पडल्याने चिंता अधिक वाढली आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्याला राज्यातील सर्व नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक वस्तू खरेदीसह कोणत्याही कारणास्तव कोठेही गर्दी करण्याचे टाळावे. वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.