Mumbai : राज्यात 440 नवीन रुग्ण, 19 मृत्यू; एकूण रुग्ण संख्या 8068

एमपीसी न्यूज : राज्यात दिवसभरात 19  कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 440  रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या 8068  वर पोहोचली आहे. तर 112 रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंत एकूण 1188  रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी गेले आहेत.

आज मृत्यू झालेल्या 19  पैकी मुंबई येथील सर्वाधिक 12 , पुणे महापालिका हद्दीतील 3 , जळगावातील 2  आणि सोलापूर आणि लातूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये 11  पुरुष आणि 8  महिलांचा आहेत. या पैकी 7  रुग्ण 60  वर्षांपुढील होते. तर अन्य 10  जण 40  ते 59  वर्ष वयोगटातील, तर दोघे 40  वर्षांखालील आहेत.

19  मृतांपैकी 4  जणांच्या   इतर आजाराची माहिती मिळू शकली नाही. उर्वरित 15  पैकी 11 जणांना 70  टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग असे गंभीर आजार असल्याचे आढळून आले. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 342  बळी गेले आहेत.

आज राज्यभरात एकूण 1,16,345 नमुन्यांपैकी 1,07,519 रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. तर 8068 नमुने पॉझिटिव्ह आहे. सध्या राज्यात 1,36,926  नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 9160  नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.