Mumbai: राज्यात आज दिवसभरात करोनाचे 778 नवीन रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 6427 तर, 14 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोनाच्या 778 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनाबाधितांची संख्या जसजशी वाढत आहे, तशी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात करोनाच्या ७७८ नव्या रुग्णांची नोंद झाली.  करोनाबाधितांची एकूण संख्या 6427 झाली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 6, पुणे 5, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी आठ पुरूष तर, सहा महिला आहेत. दोघेजण 60 वर्षांवरील आहेत. 40 ते 59 वयोगटातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृत तीन रुग्ण हे 40 वर्षांखालील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 840 जण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आज 51 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात 840 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 5304 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 96  हजार 369 नमुन्यांपैकी 89 हजार 561 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, 8702 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात 14 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 283 झाली आहे. आज मृत्यू झालेल्या दोन रुग्णांबाबत इतर आजारांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

उर्वरित 12 मृत्यूंपैकी 7 रुग्णांमध्ये (58 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.