Mumbai: कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर!

एमपीसी न्यूज – मुंबईत आज नवीन पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, मुंबईत एका 85 वर्षीय कोरोना संशयित डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

राज्यात आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील 12 नवीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 147 वर जाऊन पोहचली होती. त्यानंतर मुंबईत पाच तर वाशीमध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 153 झाली.

मुंबईत कोरोनाबाधितांचे अर्धशतक तर राज्यात दीड शतक पूर्ण झाले. मुंबईत आतापर्यंत एकूण पाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मुंबईत 55, सांगलीत 24, नवी मुंबई, कल्याण, डोंबवलीत प्रत्येकी सहा, नागपूरमध्ये 9 तर पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये 31, ठाणे, यवतमाळ प्रत्येकी चार तर अहमदनगरमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.