Mumbai :  राज्यात 857 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, आज 2940 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण संख्या 44 हजार 582

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शुक्रवारी) 2940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 582 झाली आहे. राज्यात आज 857 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 12 हजार 583 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 30 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आज 63 रुग्णांचा बळी गेला असून, एकूण मृतांची संख्या 1,517 वर गेली आहे.आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 27, पुण्यात 9, जळगावमध्ये 8, सोलापूरात 5, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद शहरात 3, साताऱ्यात 2, मालेगाव 1, ठाणे 1, कल्याण डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहरात 1 मृत्यू झालाआहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 32 हजार 777 नमुन्यांपैकी 2 लाख 88 हजार 195 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत, तर 44 हजार 582 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 6 हजार 275 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 28 हजार 430 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मंडळनिहाय रुग्णांची संख्या (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

ठाणे मंडळ एकूण : 34107 (1027)

नाशिक मंडळ : 1513 (103)

पुणे मंडळ : 5729 (280)

कोल्हापूर मंडळ : 411 (5)

औरंगाबाद मंडळ : 1367 (43)

लातूर मंडळ : 211 (6)

अकोला मंडळ :672 (34)

नागपूर मंडळ :  524 (8)

इतर राज्ये: 48 (11)

एकूण:  44 हजार 582  (1517)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.