Mumbai : बंधपत्रित तसेच कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

A large increase in the remuneration of bonded as well as contract doctors; Chief Minister Uddhav Thackeray's decision

एमपीसी न्यूज – बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्स आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

सरकारी तरतुदीनुसार वाढीव मानधनाबाबत  पुढील बदल करण्यात आले आहेत.

# आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांऐवजी आता 75 हजार मानधन दिले जाणार.

# आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना 70 हजारऐवजी 85 हजार मानधन

# इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार मानधन

# इतर भागातील  विशेषज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानधनवाढी बाबत घोषणा केली आहे. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार असून, डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.