Mumbai : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शार्दुल ठाकूरने सुरू केला गोलंदाजीचा मैदानी सराव

Mumbai: Shardul Thakur becomes first Indian cricketer to resume outdoor training after corona lockdown

एमपीसी न्यूज – कोरोना लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूर यांने मैदानी सरावाला सुरूवात केली आहे. कोरोना विषाणूच्या सक्तीच्या ब्रेकनंतर मैदानी सराव सुरू करणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे. शार्दुल भारताकडून एक कसोटी, 11 एकदिवसीय सामने आणि 15 T-20 सामने खेळला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व ठिकाणी थैमान घालत असताना जगात सर्वच ठिकाणी सर्वच खेळ अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. IPL सह इतर सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. भारतात सुद्धा कोरोनाचे संकट पाहता सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. चौथ्या लाॅकडाऊनची नियमावली जाहीर करताना महाराष्ट्र सरकारने ग्रीन व ऑरेन्ज झोन मधील मैदाने वयक्तिक सरावासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे पालघर जिल्ह्यातील भोईसर येथील एका शार्दुल ठाकूर सराव करताना दिसून आला. पीटीआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शार्दुल म्हणाला दोन महिन्यांनंतर मैदानावर सराव करण्याचा  आनंद वेगळा होता. मैदानावर सराव करण्याच्या पूर्वी खेळाडूंचे तापमान तपासणी करण्यात आली तसेच प्रत्येक खेळाडूला टाकण्यासाठी वेगवेगळा चेंडू दिला होता आणि त्या चेंडूचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सध्या लाॅकडाऊनच्या काळात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी घरीच व्यायाम करत आहेत. हे खेळाडू सुद्धा मैदानावर सराव करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मोहम्मद शमीने काही दिवसांपूर्वी आपल्या शेतात सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1