Mumbai : राज्यात विमानसेवा बंदच राहणार- गृहमंत्री अनिल देशमुख

Mumbai: Airlines will remain closed in the state - Home Minister Anil Deshmukh

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारने 25 मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे राज्यात विमानसेवेवर मात्र बंदी कायम राहणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विमानसेवा सुरू करण्याबाबत केलेल्या ट्विट मध्ये ते म्हणाले,  रेड झोन मधील विमानतळ कोरोना परिस्थितीत  सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटीव्ह प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

गृहमंत्री पुढे म्हणाले, ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग अथवा प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोकाही वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आंतरराष्ट्री विमानसेवा ऑगस्टपर्यंत सुरू करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबई आणि पुण्यातील प्रवाशांना मात्र विमान प्रवासासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी गरजेची विमाने सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.