Mumbai: जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाशिवाय इतर सर्व दुकाने बंद – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या महानगरातील जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकाने, खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जीवानावश्यक वस्तूमंध्ये किराना, अन्नधान्यांची दुकाने चालू राहतील. आर्थिक व्यवहारासांसाठी बँकाही चालू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 52 वर गेली आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आता जगण्यासाठीची लढाई सुरु झाली आहे. पुढचे 20 दिवस अत्यंत चिंतेचे, महत्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी जगण्यासाठी घरात शांत राहणे गरजेचे आहे. त्याशिवाय पर्याय राहिला नाही. कोरोनाचे बाधित 52 रुग्ण आहेत. त्यातील पाच रुग्ण विषाणूमुक्त झाले आहेत. हे समाधान बाळगण्यासारखे आहे.

गर्दी, बसेस वापरण्याची गर्दी बंद करत आहोत. त्यामुळे गर्दी कमी होईल. फिरण्याची सुट्टी नाही. त्यामुळे नागरिकांनी घरात बसूनच काळजी घ्यावी. सरकारची सर्व यंत्रणा सज्ज आहे. लढत आहे. नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. बँका चालू राहतील. आर्थिक व्यवहार महत्वाचे आहेत. पुढे आर्थिक संकट येणार आहे. त्यावर देखील सरकार देखील काम करत आहेत. संकटाच्या काळात माणुसकी सोडू नका, हातावर पोट असणा-यांचे वेतन कमी करु नका असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.