BNR-HDR-TOP-Mobile

Mumbai: अमित गोरखे यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा (राज्यमंत्री दर्जा) पदभार अमित गोरखे यांनी आज (मंगळवारी) स्वीकारला. मुंबईतील महामंडळाच्या कार्यालयात गोरखे यांनी पदभार स्वीकारला आणि कामाला सुरुवात केली.

अमित गोरखे यांची 12 मार्च रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्याबाबतचा अध्यादेश जारी केला नव्हता. सामाजिक न्याय विभागाने शुक्रवारी (दि. 7) गोरखे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. त्यानंतर गोरखे यांनी आज मुंबईतील महामंडळाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. आजपासून कामाला सुरुवात केली.

  • दरम्यान, महामंडळातर्फे मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. महामंडळाचे सुमारे 300 कोटीचे बजेट आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे युवा नेते, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अमित गोरखे यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राकडे अध्यक्षपद आले आहे.

उच्चशिक्षित आणि युवा अध्यक्ष महामंडळाला मिळाला आहे. त्यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला तिसरे महामंडळ मिळाले आहे.

.