Mumbai : अमित ठाकरे यांच्याकडून डॉक्टरांसाठी 1000 पीपीई किट्स आणि मास्क ‘मार्ड’कडे सुपूर्द

एमपीसी न्यूज- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1000 पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवरून याबद्दल माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले,  डॉक्टर्स ज्यापद्धतीने जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझ्या कुटुंबच्या वतीने मी डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो.

या मदतीबद्दल  मार्डने अमित ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.