Mumbai : स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त 12 कोटी 44 लाख

रेल्वेभाड्यापोटी दिली एकूण 67 कोटी 19 लाख रुपयांची रक्कम

एमपीसी न्यूज – स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 54 कोटी 75 लाख 47 हजार 70 रुपये जमा केले होते.

आता सहा जिल्ह्यांना अतिरिक्त 12 कोटी 44 लाख 8 हजार 420 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. म्हणजेच स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत 67 कोटी 19 लाख 55 हजार 490 रुपये देण्यात आले आहेत. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

सहा जिल्ह्यांना वाढीव निधी

ज्या सहा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्यात आला ते जिल्हे पुढीलप्रमाणे : मुंबई उपनगर जिल्हा- 10 कोटी, अहमदनगर- 30 लाख, सातारा- 49 लाख 68 हजार 420, सांगली- 44 लाख 40 हजार, सोलापूर- 20 लाख, कोल्हापूर- 1 कोटी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.