Wakad accident : मुंबई- बंगळूरू महामार्गावर वाकड पुलावर अपघात, तीन जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई- बंगळूरू महामार्गावर वाकड पुलावर अपघात झाला आहे. पिकअप नाल्यात पडली असून यामध्ये अडकलेला चालक महेंद्र चौधरी, वय 21 वर्षे, रा. (Wakad accident) अमरावती याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर इतर दोघही जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राहटणी अग्निशमन केंद्राचे कर्मचारी यांनी सांगितले की, आज पहाटे 4 वा एक पिकअप गाडी मुंबई- बंगळूरू महामार्गावर वाकड ब्रिज वरून नाल्यात पडली होती. त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राठोड यांनी अग्निशमन विभागाला कळवले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राहटणी व पिंपरी अग्निशमन केंद्रांचे प्रत्येकी अग्निशमन बंब तसेच पीएमआरडीए चा एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला होता.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 14 – धूमकेतू नरेंद्र हिरवाणी

त्यामध्ये चालक महेंद्र चौधरी, वय 21 वर्षे, रा. अमरावती हा अडकला होता. स्टीरिंग वाकल्याने त्याचा पाय अडकला होता त्यामुळे तो बाहेर येऊ शकत नव्हता.(Wakad accident) उभ्या गाडीतच स्टेरिंग कापून त्याचा पाय सोडवून त्याला बाहेर काढण्यात आले. या पीक अप मध्ये इतर दोन जण होते. या अपघातात तेही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फायरमन अशोक इंगवले, विनायक नाळे, मयूर कुंभार, अथर्व मुजावर, सुरज धोंडीवाले व दिलीप गायकवाड यांनी हे रेस्कयू ऑपेरेशन पार पाडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.