Mumbai : आयुष्य अगदीच छोटं आहे हे या लॉकडाऊनमुळे जॅकलिनले जाणले

एमपीसी न्यूज : ‘लॉकडाउनच्या या खडतर काळात समजतंय आयुष्य अगदीच छोटं आहे. सध्याच्या काळात आयुष्यातला एक मोठा धडा आपण शिकतो आहोत, अशा भावना प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसने व्यक्त केल्या आहेत’.

‘आपण या पृथ्वीवर जन्माला आलो आहे हे आपलं भाग्य आहे. मात्र, आपण आपल्या पृथ्वीला गृहित धरतो. त्यामुळे आपल्याला करोनासारख्या संकटाला सामोरं जावं लागतंय. आज लॉकडाउनच्या काळात समजतं आहे की आयुष्य किती छोटं आहे’, असंही जॅकलिनने पुढे म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर अडकून पडली आहे. तिने आपले तेथील अनुभव आणि घालवलेले दिवस याबद्द्ल भावना व्यक्त केल्या आहेत. लॉकडाउनच्या काळातच जॅकलिनने एक शॉर्ट फिल्मही चित्रीत केली आहे. सध्या आपल्या हाती असलेला काळ हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे असंही जॅकलिनने म्हटलं आहे.

मूळची श्रीलंकेची असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस आणि मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका असलेला मिसेस सीरियल किलर हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच NETFLIX वर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा जॅकलिनने तिच्या समर्थ अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. सध्या ती घोडेस्वारी, वाचन यांसारख्या छंदाना ती वेळ देते आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.