Mumbai: दिवसभरात कोरोनाचा तिसरा बळी, धारावीतील कोरोनाबाधिताचा मृत्यू!

एमपीसी न्यूज – दिवसभरात मुंबईत करोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरलीे. धारावीत आज आढळलेल्या 56 वर्षीय करोनाबाधीत रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला. 

धारावीतील एसआरए बिल्डिंगमधील या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या व्यक्तीला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्यक्तीच्या कुटुंबातील सात सदस्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. एसआरए बिल्डिंगही सील करण्यात आली होती.

कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने धारावी परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. या व्यक्तीला ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचे मूत्रपिंडही निकामी झाले व या साऱ्यातून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.