Mumbai कोरोना : ‘MPSC’च्या दोन परीक्षा पुढे ढकलल्या

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ५ एप्रिलची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मेची संयुक्त पूर्व परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. या परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून नुकतीच करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.