Mumbai : पुण्यात आठ जणांना कोरोना विषाणूची बाधा!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुण्यात आठ रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. तरीही नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

दरम्यान, शहरामध्ये कोरोनाचे एकूणआठ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक तसेच दुबईला ट्रीपला गेलेला यवतमाळचा रहिवासी व सध्या पुण्याला असलेला या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याव्यतिरिक्त ट्रीपला गेलेल्यांपैकी ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे.

या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.