Mumbai : अरेच्चा! बोनी कपूर यांच्या घरात करोनाचा रुग्ण

Mumbai : Corona's patient at Bonnie Kapoor's house

एमपीसी न्यूज – बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोनी कपूरसह दोन्ही मुली म्हणजे जान्हवी आणि खुशी कपूरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे.

बोनी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. ‘आमच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तो शनिवारी संध्याकाळपासून आजारी होता. त्यामुळे शंका आल्याने आणि काळजीपोटी आम्ही त्याला करोना चाचणी करण्यासाठी पाठवले. तेव्हा त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. नंतर त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळताच आम्ही त्याची माहिती आमच्या सोसायटीमध्ये दिली’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

जान्हवीने देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. याबद्दल माहिती देताना बोनी कपूर यांनी पुढे म्हटले आहे की, ‘आम्ही सर्वजण आणि माझ्या घरात काम करणारे इतर कर्मचारी ठीक आहेत. आम्हाला कोणालाच करोनाची लक्षणे जाणवत नाहीत. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरातच आहोत. आम्ही घराबाहेर गेलेलोच नाही’.

‘आता आम्ही सगळ्यांनी पुढचे १४ दिवस स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीने आमच्याकडे लक्ष दिले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मला विश्वास आहे सर्वकाही लवकरच ठीक होईल’,  असा विश्वासही बोनी कपूर यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like