Mumbai : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘महाकवच ॲप’ची निर्मिती

एमपीसी न्यूज – कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाणार आहे. यासाठी महाकवच या मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.

नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेल्या ‘महाकवच ॲप’च्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइन ट्रॅकिंग करता येणार. नाशिक प्रशासनाने उपयोगात आणलेल्या या ॲपचा लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभरात वापर होणार.

केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाकवच ॲप’ची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतली जाणार असून लवकरच हे मोबाईल ॲप्लिकेशन महाराष्ट्रभरात वापर करण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.