-MPC-TOP-MOST-BANNER-I

Mumbai Crime News : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना ‘एनआयए’ने आज दुपारी अटक केली. त्याआधी सकाळी त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी एनआयएने छापा टाकला होता.

‘अँटिलिया’बाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि त्यानंतरचे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. या चौकशीसाठी एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असताना एनआयएने त्यांना अटक केली.

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यानंतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn