Mumbai : टाटा समूहाच्या अध्यक्षपदी पुन्हा ‘सायरस मिस्त्री’

एमपीसी न्यूज – टाटा समूह व्यवस्थापनाला राष्ट्रीय कंपनी लवादाने मोठा दणका दिला आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेली प्रक्रीया अवैध ठरवली आहे. त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.  दरम्यान, टाटा समूहाकडे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पर्याय खुले आहेत.

टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांची कार्यकारी अध्यक्षपदी केलेली नियुक्ती अवैध ठरवली आहे. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठी न्यायिक लढाई समजल्या जाणाऱ्या या खटल्याचा निकाल सायरस मिस्त्रींच्या बाजूने लागला आहे.

कार्यकारी अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय बेकायदा आहे, असा निर्णय ‘राष्ट्रीय कंपनी लवादा’ने (NCLT) दिला आहे. त्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्याचे आदेश देत सध्याच्या कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती बेकायदा ठरवली आहे. त्यामुळे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. लवादाच्या या निर्णयाला टाटा समूह सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.