Mumbai :’धकधक गर्ल’ने पोस्ट केला लहानपणीचा बहिणीसोबतचा फोटो

एमपीसी न्यूज : ‘एक दो तीन गर्ल’, ‘धकधक गर्ल’, ‘हम आपके है कौन’मधली ‘निशा’ म्हणजे कोण असा कोणालाच प्रश्न पडणार नाही. कारण त्याचे उत्तर सगळ्यांनाच माहित आहे, आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. येत्या १५ मेला वाढदिवस साज-या करणा-या माधुरी दीक्षितने नुकताच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

अगदी लहान वयात ‘अबोध’ या चित्रपटातून पदार्पण करणा-या माधुरीला लोकप्रियता मिळाली ती ‘तेजाब’ या चित्रपटाने. त्यातले तिचे ‘एक दो तीन’ हे गाणे प्रचंड पॉप्युलर झाले. त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही.

मनमोहक, खट्याळ हसू, अप्रतिम सौंदर्य, उत्स्फूर्त अभिनय या शस्त्रांच्या जोरावर तिने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केले. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करुन ती अमेरिकेत गेली, तेव्हा अनेकांच्या आयुष्यात जणूकाही पोकळी निर्माण झाली होती.

अशा या ‘धकधक गर्ल’ने नुकताच आपल्या बहिणीसोबतच एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला. माधुरीची बहीण रुपा हीदेखील तिच्याइतकीच सुंदर आहे आणि नृत्यनिपुण देखील आहे.

माधुरीच्या करियर मागे तिचा मोठा हात आहे. घरातले शेंडेफळ असलेल्या माधुरीला तिच्या दोन्ही बहिणी म्हणजे रुपा आणि भारती यांचा प्रचंड पाठिंबा होता.

माधुरी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ती फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिच्या कुटुंबीयांचे फोटो, तिच्या डान्सचे व्हिडीओ यांचाही समावेश असतो. या फोटोत ती आणि तिची बहिणी डान्स करताना दिसत आहेत.

हा फोटो माधुरीच्या लहानपणीचा आहे. विशेष म्हणजे माधुरीची बहिण हुबेहूब तिच्यासारखी दिसत असून त्यांची हेअर स्टाइलदेखील सारखीच असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘माझ्या बहिणीसोबत अनेक आठवणी आहेत. मात्र, ही सगळ्यात आवडती आठवण आहे. आम्ही शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचो. माझ्या सगळ्यात आवडत्या सोबतीसह मी हा फोटो शेअर करत आहे. तुमच्या लहानपणातील तुम्हाला लक्षात राहिलेली, आवडती आठवण कोणती? सांगू शकता का?’, असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे.

लग्नानंतर अमेरिकेत सेटल झालेली पुढे काही वर्षांनी भारतात परतली, त्यानंतर तिने काही हिंदी चित्रपट केल्यावर मराठी चित्रपट निर्माण करुन त्यात अभिनयदेखील केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.