Mumbai: आज 1,216 नवीन रुग्णांचे निदान; एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 हजार 974

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  17 हजार 974 झाली आहे. आज 1,216 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर राज्यात आज 207 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3,301 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 02 हजार 105 नमुन्यांपैकी 1 लाख 83 हजार 880 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 17 हजार 974 जण पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 12 हजार 742 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या 8,816 रुग्णांचे त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत –

●   या एकूण भरती रुग्णांपैकी 5,228 ( 59 टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत.

●  3209 (36 टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर

● 424 ( 5 टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 ( 3 टक्के)  रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर 92 (1 टक्का) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

आज राज्यात 43 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 694 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 24, पुण्यातील 7 , वसई विरार मध्ये 5, सोलापूर शहरात 2, अकोला शहरात 1, पालघरमध्ये 1 आणि  औरंगाबाद शहरात 1 मृत्यू झाला आहे.  याशिवाय मणिपूरमधील एका आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 24 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 43 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 25 रुग्ण आहेत तर 14 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. 43 रुग्णांपैकी 29 जणांमध्ये (67 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 694 झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 11 हजार 394(437)

ठाणे: 93 (2)

ठाणे मनपा: 650 (8)

नवी मुंबई मनपा: 659 (4)

कल्याण डोंबिवली मनपा: 263 (3)

उल्हासनगर मनपा: 14

भिवंडी निजामपूर मनपा: 21 (2)

मीरा भाईंदर मनपा: 189 (2)

पालघर: 46 (1)

वसई विरार मनपा: 187 (9)

रायगड: 76 (1)

पनवेल मनपा: 125 (2)

ठाणे मंडळ एकूण: 13,717 (472)

नाशिक: 47

नाशिक मनपा: 54

मालेगाव मनपा:  432 (12)

अहमदनगर: 44 (2)

अहमदनगर मनपा: 9

धुळे: 8 (2)

धुळे मनपा: 24(1)

जळगाव: 64 (11)

जळगाव मनपा: 14 (2)

नंदूरबार: 19 (1)

नाशिक मंडळ एकूण: 715 (31)

पुणे: 105 (4)

पुणे मनपा: 1899 (122)

पिंपरी चिंचवड मनपा: 125 (3)

सोलापूर: 6

सोलापूर मनपा: 177 (10)

सातारा: 94(2)

पुणे मंडळ एकूण: 2406 (141)

कोल्हापूर: 10 (1)

कोल्हापूर मनपा: 6

सांगली: 32

सांगली मिरज कुपवाड मनपा: 3 (1)

सिंधुदुर्ग: 4 (1)

रत्नागिरी: 16 (1)

कोल्हापूर मंडळ एकूण: 71 (3)

औरंगाबाद: 3

औरंगाबाद मनपा: 397 (12)

जालना: 8

हिंगोली: 58

परभणी: 1 (1)

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 468 (13)

लातूर: 25 (1)

लातूर मनपा: 0

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: 3

नांदेड मनपा: 29 (2)

लातूर मंडळ एकूण: 61 (3)

अकोला: 9 (1)

अकोला मनपा: 90 (9)

अमरावती: 4 (1)

अमरावती मनपा: 69 (9)

यवतमाळ: 93

बुलढाणा: 24 (1)

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 290 (21)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 204 (2)

वर्धा: 0

भंडारा: 1

गोंदिया: 1

चंद्रपूर: 1

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण: 212 (2)

इतर राज्ये: 34 (8)

एकूण:  17 हजार 974 (694)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1,087 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 21 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 51.76 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.