Mumbai: नागरिकांनो बेजबाबदारपणे वागू नका, घरात बसून सरकारला सहकार्य करा – अजित पवार

एमपीसी न्यूज – अमेरिका, स्पेन, इटलीमध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून त्याचा धडा घेत महाराष्ट्रातील नागरिकांनो आता तरी शहाणे व्हा.  बेजबाबदारपणे वागू नका, घरात बसून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन उमपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात काही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही. भाजीखरेदीसाठी गर्दी करणे बंद करावे. घरातच थांबून या लढ्यात  योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांची  खैर करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिली आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार  या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.