Mumbai : लोहमार्गावरून चालू नका; मध्य रेल्वेचे आवाहन

Mumbai: Don't Walk on the railway track; Central Railway Appeal

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत जे नागरिक पायी गाव गाठत आहेत. त्यातील बहुतांश रेल्वेच्या लोहमार्गाने चालत जात आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथे मालगाडीच्या धडकेत गंभीर अपघात देखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेच्या लोहमार्गाने जाऊ नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. मात्र, या कालावधीत मालवाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. देशभर आवश्यक साहित्य, वस्तू पोहोचविण्यासाठी मालगाड्या, लर्सल रेल्वे धावत आहेत.

भारतीय रेल्वेने देशभर ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिक, पर्यटक, भाविक, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेची व्यवस्था केली आहे. या रेल्वेगाड्या दोन्ही राज्यांच्या सहमतीने (ज्या राज्यातून निघणार, ज्या राज्यात पोहोचणार) चालवली जात आहे. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय रेल्वेकडून घोषित केलेल्याही रेल्वे धावत आहेत.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी राज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे धावत आहेत. मालगाडी, पार्सल, विशेष रेल्वे, श्रमिक रेल्वे यांची सेवा सुरू आहे. लोहमार्ग आणि मार्गाच्या आजूबाजूने चालणे धोक्याचे आहे. याबाबत रेल्वेकडून जागरूकता अभियान राबविले जात आहे. नागरिकांनी लोहमार्गाने जाऊ नये असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.