BNR-HDR-TOP-Mobile

Mumbai : संघर्षाच्या काळात ओबीसी कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिले उभे राहिले -जयंत पाटील

एमपीसी न्यूज- संघर्षाच्या काळात ओबीसी कार्यकर्ते पक्षाच्या पाठीशी उभा राहिले. आता राज्यातील बारा बलुतेदार आपल्याशी कसे जोडले जातील, याचा विचार आपण करायला हवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या ओबीसी सेलच्या बैठकीत जयंत पाटील बोलत होते. पाटील यांनी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांचा सत्कार केला. याप्रसंगी आमदार राजेश टोपे, आमदार हेमंत टकले, बसवराज पाटील नागराळकर देखील उपस्थित होते.

निवडणुकीच्या काळात ओबीसी सेलने राज्यभरात केलेल्या कार्याची पाटील यांनी यावेळी दखल घेतली.

यावेळी पाटील म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व वाढवायचे आहे. पक्ष तळागाळापर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी लोकांचे प्रश्न मांडा, महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये जनतेला न्याय मिळवून देऊ. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०० जागांहून अधिक जागा जिंकेपर्यंत आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत.

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत बैठकीत मनोगत व्यक्त केले. त्यावेळी उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे व तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष मेघराज हुलावळे उपस्थित होते.

Advertisement